Author: Team Urban Sahakar Times

“ सहकारी संस्थांकडून कर्ज घेऊन ते मुद्दाम न फेडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्जदारांना यांनी मोठा झटका दिला आहे. सहकार कायद्यातील कलम ९१ अंतर्गत स्थापन झालेल्या सहकार न्यायालयाला, कलम १०१ अंतर्गत सुरू असलेल्या वसुली प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे सहकार क्षेत्रातील वसुली प्रक्रिया अधिक प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे प्रकरण अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्थेशी संबंधित आहे. शिर्डी येथील धनंजय शेळके आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पतसंस्थेकडून कर्ज घेतले होते. मात्र, वारंवार विनंती करूनही त्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. परिणामी, पतसंस्थेने सहकार कायद्यातील कलम १०१ नुसार वसुली प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, कर्जदार धनंजय…

Read More

नवी दिल्ली : बँकेचे एटीएम कार्ड सोबत नसताना तातडीने रोख रकमेची गरज भासली, तरी आता काळजी करण्याचे कारण नाही. युपीआय (UPI) तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणत्याही फिजिकल कार्डशिवाय एटीएममधून थेट रोख रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ‘UPI Cash Withdrawal’ किंवा ‘ICCW’ (Interoperable Cardless Cash Withdrawal) या सुविधेमुळे ग्राहकांना सुरक्षित आणि सोपी पद्धत उपलब्ध झाली आहे. या सुविधेमुळे कार्ड हरवण्याची, चोरी होण्याची किंवा कार्ड क्लोनिंगचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे डिजिटल व्यवहारासोबतच एटीएममधून रोख रक्कम काढण्याची प्रक्रिया अधिक सुरक्षित बनली आहे. UPI द्वारे पैसे काढण्याची प्रक्रिया यासाठी सर्वप्रथम ‘UPI Cash Withdrawal’ किंवा ‘ICCW’ सुविधा असलेले एटीएम शोधावे. एटीएमच्या…

Read More

कोल्हापूर : बचतीच्या बाबतीत शक्ति ठेवण्याबरोबरच पै पै रूपिणी साठवून पुरुषांपेक्षा महिला या नेहमीच सरस राहिल्या आहेत. अगदी एक-एक रुपयांचा हिशोब आर्थिक संसाराला हातभार लावण्यात त्या पुढे असतात. त्यामुळे महिलांच्या बचतीला चालना देत त्यांना उद्योग-व्यवसायासाठी भक्कम आर्थिक आधार मिळावा यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात ‘लाडकी बहीण पतसंस्था’ सुरू केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने ‘लाडकी बहीण पतसंस्था’ सुरू केली असून, आतापर्यंत ११०० महिला या पतसंस्थेच्या सभासद झाल्या आहेत. या पतसंस्थेच्या माध्यमातून आपली रक्कम सुरक्षित ठेवण्यासोबतच कमी व्याजदरात कर्ज घेऊ शकतील. तसेच एफडी, आरडीसह पतसंस्थेतील इतर वित्तीय सुविधा मिळू शकतील. महिला सक्षमीकरणासाठी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेंतर्गत…

Read More

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा अग्रगण्य ठरला आहे. जिल्ह्यात तब्बल ४५ नागरी सहकारी बँका कार्यरत असून त्यापैकी २९ बँकांचा निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. यावरून या बँकांची आर्थिक सक्षमता स्पष्ट होते. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये ठेवीत तब्बल ९१८ कोटींची वाढ झाली आहे. कर्जवाटपात ३५९ कोटींची वाढ झाली असली तरी वसुलीचे प्रमाण लक्षणीय चांगले आहे. सहकाराची पंढरी : कोल्हापूर कोल्हापुरात बँका, पतसंस्था, साखर कारखाने, विकास संस्था, दूध संस्थांचे जाळे विणले गेले आहे. राज्याच्या तुलनेत येथेच खऱ्या अर्थाने सहकार रुजला आणि बहरला आहे. त्यामुळे कोल्हापूरला ‘सहकार पंढरी’ अशी ओळख मिळाली आहे. …

Read More

पुणे : राज्यातील सहकारी पतसंस्थांना अडचणीत आलेल्या नागरी सहकारी बँकांमध्ये व अन्य वित्तीय संस्थांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर करावयाच्या एनपीए तरतूदीबाबत मोठा दिलासा देण्यात आला आहे. नियामक मंडळाच्या निर्णयानुसार, अशा गुंतवणुकीसाठी प्रतिवर्षी २० टक्क्यांऐवजी केवळ १० टक्के तरतूद करावी लागणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग नियमन कायद्याच्या कलम ३५ (अ) अन्वये कार्यवाही झालेल्या बँकांतील गुंतवणूक अनुत्पादक मानली जाणार असून, त्यावर पुढील १० वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने तरतूद करावी लागेल. वसूल न झालेल्या व्याजासह मुद्दल रकमेवर १० टक्क्यांच्या हिशोबाने तरतूद करणे बंधनकारक राहील. बँकेव्यतिरिक्त इतर वित्तीय संस्थांतील अनुत्पादक गुंतवणुकीवरही हाच नियम लागू राहील, असे आदेश सहकार विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. सहकार विभागाचे परिपत्रक…

Read More

‘B’ प्लस म्हणजे फायदाच फायदा थेट एकाच दिवशी यशाचे सर्वोच्च शिखर गाठता येत नाही,हो की नाही? त्यासाठी प्रत्येक दिवशी थोडी थोडी मेहनत करावी लागते. पैशांचंही असंच आहे, ते एकदाच वाढत नाहीत.त्यासाठी रोज थोडी थोडी बचत करावी लागते. म्हणूनच श्री बुवानंद अर्बन सादर करत आहे ‘B’ प्लस डिजिटल पिग्मी खाते. या खात्याद्वारे तुम्ही रोज तुमच्या मिळकतीनुसार कधीही,कुठूनही थेट डिजिटली बचत करू शकता. एकदा खाते उघडल्यावर तुम्हाला अनेक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये पिग्मीवर कर्ज सुविधा, 6% पर्यंत व्याजदर, मोफत अपघाती विमा आणि आणखीही बऱ्याच सुविधांचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. 👉याचबरोबर तुमचा पैसा विश्वसनीय हातात सुरक्षित राहून भरघोस परतावा देणार…

Read More