Close Menu
Urban Sahakar Times
  • Home
  • मुख्य बातमी
  • स्थानिक बातम्या
  • नवीन परिपत्रक/आदेश
  • वित्तीय संस्था
  • सहकार संवाद
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, April 16
Urban Sahakar Times
Facebook X (Twitter) Instagram
  • Home
  • मुख्य बातमी
  • स्थानिक बातम्या
  • नवीन परिपत्रक/आदेश
  • वित्तीय संस्था
  • सहकार संवाद
Urban Sahakar Times
  • Home
  • मुख्य बातमी
  • स्थानिक बातम्या
  • नवीन परिपत्रक/आदेश
  • वित्तीय संस्था
  • सहकार संवाद
Home»मुख्य बातमी»एटीएम कार्डशिवायही काढा रोख रक्कम; UPI द्वारे ‘कार्डलेस कॅश’ची सोपी सुविधा
मुख्य बातमी

एटीएम कार्डशिवायही काढा रोख रक्कम; UPI द्वारे ‘कार्डलेस कॅश’ची सोपी सुविधा

Team Urban Sahakar TimesBy Team Urban Sahakar TimesMarch 10, 2026Updated:March 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 

 

नवी दिल्ली : बँकेचे एटीएम कार्ड सोबत नसताना तातडीने रोख रकमेची गरज भासली, तरी आता काळजी करण्याचे कारण नाही. युपीआय (UPI) तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणत्याही फिजिकल कार्डशिवाय एटीएममधून थेट रोख रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ‘UPI Cash Withdrawal’ किंवा ‘ICCW’ (Interoperable Cardless Cash Withdrawal) या सुविधेमुळे ग्राहकांना सुरक्षित आणि सोपी पद्धत उपलब्ध झाली आहे.

 

या सुविधेमुळे कार्ड हरवण्याची, चोरी होण्याची किंवा कार्ड क्लोनिंगचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे डिजिटल व्यवहारासोबतच एटीएममधून रोख रक्कम काढण्याची प्रक्रिया अधिक सुरक्षित बनली आहे.
UPI द्वारे पैसे काढण्याची प्रक्रिया
यासाठी सर्वप्रथम ‘UPI Cash Withdrawal’ किंवा ‘ICCW’ सुविधा असलेले एटीएम शोधावे. एटीएमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या ‘UPI Cash’ किंवा ‘Cardless Cash’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला काढायची असलेली रक्कम टाईप करावी.

 

यानंतर स्क्रीनवर एक QR कोड दिसतो. मोबाईलमधील BHIM, Google Pay, PhonePe किंवा Paytm यांसारखे कोणतेही UPI ॲप उघडून हा QR कोड स्कॅन करावा. त्यानंतर संबंधित बँक खाते निवडून ४ किंवा ६ अंकी UPI PIN टाकावा. प्रक्रिया पूर्ण होताच एटीएम मशीनमधून रोख रक्कम बाहेर येते.

 

या सुविधेचे फायदे
या पद्धतीमुळे फिजिकल कार्ड सोबत ठेवण्याची गरज राहत नाही. तसेच कार्ड हरवणे, कार्ड क्लोनिंग किंवा पिन चोरीला जाण्याचा धोका कमी होतो. ही सुविधा सध्या बहुतेक प्रमुख UPI ॲप्सवर उपलब्ध आहे.

 

रक्कम काढण्याची मर्यादा
या सुविधेद्वारे एका व्यवहारात जास्तीत जास्त १० हजार रुपये काढता येतात. मात्र ही मर्यादा संबंधित बँकेच्या दैनंदिन UPI व्यवहार मर्यादेनुसार बदलू शकते. तसेच ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.

#ATM #बँक व्यवहार #अर्थकारण #युपीआय
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Team Urban Sahakar Times

Leave A Reply Cancel Reply

Urban Sahakar Times
Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
© 2026 Urban Sahakar Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.