पुणे : राज्यातील सहकारी पतसंस्थांना अडचणीत आलेल्या नागरी सहकारी बँकांमध्ये व अन्य वित्तीय संस्थांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर करावयाच्या एनपीए तरतूदीबाबत मोठा दिलासा देण्यात आला आहे. नियामक मंडळाच्या निर्णयानुसार, अशा गुंतवणुकीसाठी प्रतिवर्षी २० टक्क्यांऐवजी केवळ १० टक्के तरतूद करावी लागणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग नियमन कायद्याच्या कलम ३५ (अ) अन्वये कार्यवाही झालेल्या बँकांतील गुंतवणूक अनुत्पादक मानली जाणार असून, त्यावर पुढील १० वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने तरतूद करावी लागेल. वसूल न झालेल्या व्याजासह मुद्दल रकमेवर १० टक्क्यांच्या हिशोबाने तरतूद करणे बंधनकारक राहील. बँकेव्यतिरिक्त इतर वित्तीय संस्थांतील अनुत्पादक गुंतवणुकीवरही हाच नियम लागू राहील, असे आदेश सहकार विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. सहकार विभागाचे परिपत्रक…
Author: Team Urban Sahakar Times
‘B’ प्लस म्हणजे फायदाच फायदा थेट एकाच दिवशी यशाचे सर्वोच्च शिखर गाठता येत नाही,हो की नाही? त्यासाठी प्रत्येक दिवशी थोडी थोडी मेहनत करावी लागते. पैशांचंही असंच आहे, ते एकदाच वाढत नाहीत.त्यासाठी रोज थोडी थोडी बचत करावी लागते. म्हणूनच श्री बुवानंद अर्बन सादर करत आहे ‘B’ प्लस डिजिटल पिग्मी खाते. या खात्याद्वारे तुम्ही रोज तुमच्या मिळकतीनुसार कधीही,कुठूनही थेट डिजिटली बचत करू शकता. एकदा खाते उघडल्यावर तुम्हाला अनेक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये पिग्मीवर कर्ज सुविधा, 6% पर्यंत व्याजदर, मोफत अपघाती विमा आणि आणखीही बऱ्याच सुविधांचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. 👉याचबरोबर तुमचा पैसा विश्वसनीय हातात सुरक्षित राहून भरघोस परतावा देणार…