कोल्हापूर : बचतीच्या बाबतीत शक्ति ठेवण्याबरोबरच पै पै रूपिणी साठवून पुरुषांपेक्षा महिला या नेहमीच सरस राहिल्या आहेत. अगदी एक-एक रुपयांचा हिशोब आर्थिक संसाराला हातभार लावण्यात त्या पुढे असतात. त्यामुळे महिलांच्या बचतीला चालना देत त्यांना उद्योग-व्यवसायासाठी भक्कम आर्थिक आधार मिळावा यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात ‘लाडकी बहीण पतसंस्था’ सुरू केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने ‘लाडकी बहीण पतसंस्था’ सुरू केली असून, आतापर्यंत ११०० महिला या पतसंस्थेच्या सभासद झाल्या आहेत.
या पतसंस्थेच्या माध्यमातून आपली रक्कम सुरक्षित ठेवण्यासोबतच कमी व्याजदरात कर्ज घेऊ शकतील. तसेच एफडी, आरडीसह पतसंस्थेतील इतर वित्तीय सुविधा मिळू शकतील. महिला सक्षमीकरणासाठी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांची नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आली आहे.
महिला सह पतसंसस्थेचे सभासद होण्यासाठी महिला व बाल विकास विभाग यांनी प्रमाणित केलेल्या यादीत संबंधित महिला लाभार्थीचे नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. ज्या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत महिलांची पतसंस्था नोंदवायची आहे त्यांनी उपनिबंधकांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात लाडकी बहीण पतसंस्था सुरू केली आहे. आतापर्यंत ११०० महिला या पतसंस्थेच्या सभासद झाल्या आहेत. त्यामुळे महिलांची आर्थिक बचत होण्यास मदत होणार आहे.कुंदन शिनगारे,समन्वयक अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळलाडक्या बहिणींची बचत सुरक्षित राहणारलाडक्या बहिणींना राज्य सरकारच्यावतीने प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत केली जात आहे. या मदतीची बचत व्हावी या उद्देशाने सरकारने पतसंस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या पतसंस्थेतून लाडक्या बहिणी कर्ज घेऊ शकणार आहेत. व्याजदरही कमी असेल. शिवाय गुंतवणुकीवर व्याज मिळणार आहे.